Me Sahyadri July 2016 b

/ Sahyadri Geographic by Vivek Kale
 

 
 


 

Me Sahyadri
Volume 3, number 11
Keep Volume Low.
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded. Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation. Please give sufficient time to allow the photographs to load. Special thanks to all those who helped me during the compilation and for the help and guidance during the workshop.
 
देशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.
सह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.
As the economic development has taken the center stage, the balance between the environmental sustenance and socio economic development will be under the scanner. As most experts with balanced views have proclaimed, Indian wildlife and ecological system sustenance will be under threat, unless precautions are taken with the help of appropriate research and long term national interests. As we encounter the economic development, many habitats which indirectly or directly help sustainable development will be damaged. The awareness to gauge the success by sustainable development and not by year to year growth is a distant dream any environmentalist will assume in current scenario.
Western ghats, or Sahyadri as we all call it as, is a treasure trove of spectacular landscapes, biodiversity, flora, fauna, some amazing geological wonders and man made monuments. With the increasing pressure from human encroachment, all these elements are under stress and in turn are under depletion. Western ghats should be left untouched by human beings, to protect their future generations from getting short of resources, such as water, energy and clean air. The important elements of western ghats, which need protection are highlighted in the new version of Photo journal, Me Sahyadri Magazine. The current issue has a brief of frog life and forest, their habitat, from Coorg region of Western Ghats.
 

 

““
 
Me Sahyadri – July 2016 - II
 
बेडकांबद्दल महत्वाच्या १० बाबी, १) बेडुक पाण्याजवळ किंवा पाण्यात रहातात. ते प्रदुषणाचे निर्देशक आहेत. जलप्रदुषणामुळे बेडुकांची संख्या कमी होते आहे. शेतात वापरल्या जाणाऱ्या किटकनाशकांमुळे व इतर रसायनांमुळे जलप्रदुषण होते.
२) बेडकांचे लहान अधिवास मोठया जंगलाच्या अधिवासाचे लहान भाग असतात. झाडे, तलाव, डबकी, झुडुपे, झरे व ओढे, दगड धोंडे असे विविध अधिवास विविध बेडकांना आश्रय देतात. या सर्व घटकांचे संवर्धन म्हणजेच बेडकांचे संवर्धन होय.
३) पश्चिम घाटात दिसणारे बहुतांश बेडुक अंतर्जन्य आहेत. त्यांचा अधिवास पश्चिम घाटापुरता मर्यादीत आहे. पश्चिम घाटाचे संवर्धन म्हणजे त्यांचे संवर्धन होय.
४) जलप्रदुषण, शेतकी प्रगती, बुरशी रोगराई, अधिवासाचा विनाश अशा कारणांमुळे बेडुक कमी होत आहेत.
५)बेडुक हा खाद्यश्रुंखलेतला महत्वाचा घटक आहे. लहान किडे, डास यांना खाद्य करुन तो त्यांच्या संख्येवत नियंत्रण ठेवतो.
६) बेडुक पावसाळ्या व्यतिरिक्त काळात सुप्त (हायबरनेट) होतात.
७) बेडुक पावसाळ्यात अंडी टाकतात.
८) सह्याद्रीत आढळणाऱ्या बेडकांमध्ये बरेच बेडुक संकटात आहेत. आय यु सि एन संस्थेच्या वर्गिकरणाप्रमाणे या बेडकांना वाचवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.
९) वाघ, सिंहांवर जेवढे पैसे खर्च केले जात आहेत, त्यामानाने बेडकासारख्या लहान पण तितक्याच मह्त्वाच्या प्राण्यांकडे सर्वच दुर्लक्ष करत आहेत.
१०) पश्चिम घाटात सध्या काही नविन बेडकांचे शोध लागले आहेत. बऱ्याच जातींवर संशोधन चालु आहे.
10 important aspects about frog are
1) Frogs are indicators of water pollution. The population of frogs is reducing due to water pollution. Water pollution takes place due to use of pesticides and other chemicals.
2) Frogs live in microhabitats within the larger forest habitat. These microhabitats can be streams, rocks, trees, bush, puddles, soil, low foliage. Conservation of every such element within the larger forest habitat is important.
3) Western ghats has many endemic species of frogs. Conservation of western ghats is important for survival of these species.
4) Water pollution, agricultural development, tourism, fungal infections, loss of habitat are the main reasons of reduction in numbers of frogs.
5) Frog is important part of food chain. They feed on insects, mosquitoes.
6) Frogs hibernate most of the time in year during non monsoon period.
7) Most of the frogs in western ghats breed in Monsoon.
8) Many species of frogs in western ghat appear as Threatened as per IUCN red list. The species are protected as per Indian Wildlife act.
9) Govt is spending funds on tigers and lions but not on frogs.
10) Many species of frogs in western ghats are being discovered. The research on the frogs is under progress by various research organizations.
 

 

““
 
1. Waynad night frog (Nyctibatrachus grandis) , Coorg, Karnataka, western ghats, India
 
पश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये निक्टिबॅट्रचस जातीचे पाण्यांच्या प्रवाहाजवळ दगडावर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.
या विविध फ्रॉग्स मध्ये निक्टिबॅट्रचस ग्रॅन्डिस नावाचा एक मोठया आकाराचा बेडुक आहे. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, पाण्याच्या ओढ्यांलगत आढळतो. हा बेडुक निशाचर आहे. याला वायनाड निशाचर बेडुक असे म्हणतात. त्याचे प्रजनन जंगलात ओढ्यांजवळ होते. त्याच्या अंगावर सुरकुत्या असतात. त्याच्या डोळ्यांमधले बुबुळ चौकोनी असते. हा बेडुक सह्याद्रीत अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे.
The western ghats in Coorg region in Karnataka state have wide array of microhabitats for the frogs. The streams, water puddles and moist shola forest are few of these arrays of microhabitats. Both grasslands and shola forests in western ghats have seasonal water streams during the monsoon season. Nyctibatrachus frogs are seen around the water streams. These are nocturnal species mainly active in the night.
One of the Nyctibatrachus frogs of the region is Nyctibatrachus grandis, commonly known as Wayanad night frog. Nyctibatrachus grandis is recorded in torrential freshwater streams in evergreen and moist deciduous forest. Breeding takes place in streams in the forest. It is not seen in degraded forests.
It is endemic to western ghat, and is rated as not evaluated as per IUCN red list.
The frog is gray in color with black markings and wrinkled texture. The front leg and hind leg digits have discs which help the frog to climb the rocks.
 

 

 
2. Waynad night frog (Nyctibatrachus grandis) , Coorg, Karnataka, western ghats, India
 
 

 

““
 
3. Waynad night frog (Nyctibatrachus grandis) , Coorg, Karnataka, western ghats, India
 
 

 

““
 
4. Waynad night frog (Nyctibatrachus grandis) , Coorg, Karnataka, western ghats, India
 
 

 

““
 
5. Waynad night frog (Nyctibatrachus grandis) , Coorg, Karnataka, western ghats, India
 
 

 

““
 
6. Waynad night frog (Nyctibatrachus grandis) , Coorg, Karnataka, western ghats, India
 
 

 

““
 
7. Waynad night frog (Nyctibatrachus grandis) , Coorg, Karnataka, western ghats, India
 
 

 

““
 
8. Ornate Toad, Ghatophryne ornata, Coorg, Karnataka, western ghats, India
 
श्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये विविध जातीचे पाण्यांच्या प्रवाहाजवळ दगडावर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.
या विविध फ्रॉग्स मध्ये घाटोफ्राइन ओर्नाटा नावाचा एक मध्यम आकाराचा टोड बेडुक आहे. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, पाण्याच्या ओढ्यांलगत आढळतो. हा बेडुक रात्री व दिवसा सक्रिय असतो. याला मलबार टोरेंट टोड किंवा काळा टोरेंट टोड असे म्हणतात. त्याचे प्रजनन जंगलात ओढ्यांजवळ होते. हा बेडुक सह्याद्रीत अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणाप्रमाणे हा बेडुक "एन्डेन्जर्ड" आहे. याचा अर्थ या बेडकाची संख्या कमी होत असुन त्याच्या अधिवासाला संरक्षणाची गरज आहे. हा बेडुक थोडा अजब आहे. रंगाने काळापट तपकिरी करडा असा हा बेडुक पोटाकडे मात्र भडक रंगाचा आहे. याच्या पोटावर लाल रंगावर पिवळे मोठे ठिपके असतात. तसेच याच्या हनवटीच्या खालच्या बाजुस पिवळे ठिपके असतात. संकट प्रसंगी जेंव्हा याच्यावर हल्ला होतो तेंव्हा हा उलटा पडतो. पोट वर करुन तो मेल्याचे सोंग करतो. त्याच्या पोटावरच्या भडक रंगांकडे पाहुन हल्ला करणाऱ्या सापाच्या किंवा इतर प्राण्याला तो विषारी असल्याचा संशय येतो. या मुळे त्याचे प्राण वाचु शकतात. असे करताना तो पोट फुगवतो व अजिबात हालचाल करत नाही.
The western ghats in Coorg region of Karnataka state has wide array of microhabitats for the frogs. The streams, water puddles and moist shola forest are few of these arrays of microhabitats. Both grasslands and shola forests in western ghats have seasonal water streams during the monsoon season. One of the toads of the region is Ghatophryne ornata, commonly known as ornate toad, Malabar torrent toad or black torrent toad. The toad lives in crevices among small rocks to large boulders in streams. It is observed to be both active during day and night. The skin of Ghatophryne ornata is rough. The underbelly is usually held above the ground. The frog is dark brick red to black colored. Underside of the toad has bright red color with circular yellow spots. Base of mandible has two yellow spots. The bright coloration on the underside could be for defensive reflex. When the frog is threatened it pretends dead upside down with its bright colors visible as warning. Such reflex is executed most often in the face of an imminent attack by a predator. It is characterized by the toad’s contortion or arching of its body to reveal previously hidden bright colors. The toad remains immobile during the display and swallows air to look larger. This display serve as a warning to nearby predators that the amphibian in question may be poisonous. Ghatophryne ornata, is endemic to Western Ghats, and is rated as endangered as per IUCN red list.
 

 

““
 
9. Ornate Toad, Ghatophryne ornata, Coorg, Karnataka, western ghats, India
 
 

 

““
 
10. Nyctibatrachus sanctipalustris , Coorg, Karnataka, western ghats, India
 
पश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये निक्टिबॅट्रचस जातीचे पाण्यांच्या प्रवाहाजवळ दगडावर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.
या विविध फ्रॉग्स मध्ये निक्टिबॅट्रचस सॅन्कटिपालुस्ट्रिस नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, पाण्याच्या लहान ओढ्यांलगत आढळतो. हा बेडुक निशाचर आहे. याला कुर्ग निशाचर बेडुक असे म्हणतात. त्याचे प्रजनन जंगलात ओढ्यांजवळ होते. त्याच्या अंगावर सुरकुत्या असतात. त्याच्या डोळ्यांमधले बुबुळ चौकोनी असते. हा बेडुक सह्याद्रीत अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणाप्रमाणे हा बेडुक "एन्डेन्जर्ड" आहे. याचा अर्थ या बेडकाची संख्या कमी होत असुन त्याच्या अधिवासाला संरक्षणाची गरज आहे. थोडा तपकिरी छटा असलेला हा करडा बेडुक कर्नाटक राज्यात पश्चिम घाटांमधील जंगलात १२०० मीटर उंची च्या आसपास आढळतो.
The western ghats in Coorg region in Karnataka state have wide array of microhabitats for the frogs. The streams, water puddles and moist shola forest are few of these arrays of microhabitats. Both grasslands and shola forests in western ghats have seasonal water streams during the monsoon season. Nyctibatrachus frogs are seen around the water streams. These are nocturnal species mainly active in the night.
One of the Nyctibatrachus frogs of the region is Nyctibatrachus sanctipalustris, commonly known as Coorg night frog or sacred swamp wrinkled frog. Nyctibatrachus sanctipalustris, is a semi-aquatic and inhabits marshes within moist tropical forest along the smaller streams. It is not seen in degraded forests.
It is endemic to western ghat, and is rated as “Endangered” as per IUCN red list. It is listed as Endangered because its Extent of Occurrence is less than 5,000 km2, all individuals are in fewer than five locations, and there is continuing decline in the extent and quality of its habitat. This species is mainly recorded in south western ghats forests in Karnataka north of Palakkad gap. It has been recorded from elevations up to 1,200m above sea level.
The frog is brownish in color with black markings between the eyes and wrinkled texture. The front leg and hind leg digits have discs which help the frog to climb the rocks. The frog has rhombus shaped pupil in the eyes.
 

 

““
 
11. Nyctibatrachus sanctipalustris , Coorg, Karnataka, western ghats, India
 
 

 

““
 
12. Dancing frog, Micrixalus saxicola, Coorg, Karnataka, western ghats, India
 
 

 

““
 
13. Dancing frog, Micrixalus saxicola, Coorg, Karnataka, western ghats, India
 
पश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये मिक्रिक्झेलस जातीचे पाण्यांच्या प्रवाहाजवळ दगडावर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.
या विविध बेडकांमध्ये मिक्रिक्झेलस सॅक्सिकोला हा एक अंतर्जन्य असलेला बेडुक आहे. तो कर्नाटक राज्यात सह्याद्रीच्या जंगलांमध्ये समुद्रसपाटीपासुन ४०० ते १४०० मीटर उंचीवर आढळतो. हा बेडुक पाण्याच्या प्रवाहाजवळ दगडांवर दिसतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गिकरणाप्रमाणे तो "व्हलनरेबल" आहे. त्याच्या अधिवासाला संरक्षणाची आवश्यकता आहे. पावसाळ्याच्या सुरवातीस हा बेडुक आपले प्रजनन सुरु करतो. नर बेडुक मादीला आकर्षित करण्यासाठी आवाजाबरोबर आपले मागचे पाय उंचावुन नाच करतो.
Micrixalus saxicola is a frog found in rocky streams within evergreen tropical forest, individuals are dilurnal and are often found themselves attached to the wet rocks in fast flowing streams. They breed by larval development. The species is endemic to western ghats of India. It is found at the altitude of 400-1400 m above sea level. It is listed vulnerable as per IUCN red list. The frog is commonly known as black torrent frog, jerdons oilve brown frog or small torrent frog. Micrixalus frogs are known as dancing frogs as they peculiarly wave their feet to attract females during the breeding season. This is called as foot flagging.
 

 

““
 
14. Dancing frog, Micrixalus saxicola, Coorg, Karnataka, western ghats, India
 
 

 

““
 
15. Dancing frog, Micrixalus saxicola, Coorg, Karnataka, western ghats, India
 
.
.
 

 

““
 
16. Dancing frog, Micrixalus saxicola, Coorg, Karnataka, western ghats, India
 
.
.
 

 

 
17. Dancing frog, Micrixalus saxicola, Coorg, Karnataka, western ghats, India
 
 

 

 
18. Nyctibatrachus minimus, Coorg, Karnataka, western ghats, India
 
पश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये निक्टिबॅट्रचस जातीचे पाण्यांच्या प्रवाहाजवळ दगडावर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.
या विविध फ्रॉग्स मध्ये निक्टिबॅट्रॅचस मिनिमस नावाचा एक अत्यंत लहान आकाराचा टोड बेडुक आहे. याचा आकार १० ते १४ मि. मि. असतो. हा बेडुक सदाहरित दमट शोला जंगलात, पाणथळ दलदली जवळ पानगळीत आढळतो. हा बेडुक रात्री सक्रिय असतो. याला मिनिमस बेडुक असे म्हणतात. त्याचे प्रजनन जंगलात पाणथळ ठिकाणी होते. हा बेडुक सह्याद्रीत अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणाप्रमाणे हा बेडुक "डाटा डिफिशियन्ट" आहे. याचा अर्थ या बेडकाचा अभ्यास होणे आवश्यक असुन याच्या अधिवासाची व वास्तव्याची पुर्ण माहिती अजुन उपलब्ध नाही. हा बेडुक थोडा अजब आहे. याचा आकार अत्यंत लहान आहे. तो भारतातला सर्वात लहान बेडुक आहे. त्याच्या बोटांमध्ये पडदे नसतात. तो बेडुक पाणथळ भागात असुन सुद्धा त्याला पडदे नसतात. तो अत्यंत लहान असतो व त्याला पाण्याबाहेर रहातो. हा बेडुक रात्री अवाज करुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे डोळे करडे तपकिरी असतात. रंगाने तो करडा तपकिरी असतो.
The western ghats in Coorg region of Karnataka state has wide array of microhabitats for the frogs. The streams, water puddles and moist shola forest are few of these arrays of microhabitats. Both grasslands and shola forests in western ghats have seasonal water streams during the monsoon season. Nyctibatrachus frogs are seen around the water streams. These are nocturnal species mainly active in the night.
One of the Nyctibatrachus frogs of the region is Nyctibatrachus minimus, commonly known as minimus frog. This is the smallest frog found in India and measures about 10-14 mm.
Nyctibatrachus minimus is a semi-aquatic and inhabits marshes within moist tropical Shola forests. Shola forests are patches of high-altitude forest separated from one another by undulating grassland. The males start calling from marshes inside the forest during or immediately after sunset in the monsoon period. While most species of Nyctibatrachus are aquatic, the miniature species mainly inhabit the forest floor, where they are mostly found in leaf litter or under rocks and on the banks of streams.
It is endemic to western ghat, and is rated as data defecient as per IUCN red list.
This species is mainly recorded in south Western Ghats forests in Karnataka north of Palakkad gap. The frog due to its evolution as terestrial species does not have webbings on toes and fingers. It has relatively smooth dorsal skin with faint and interrupted dorsolateral folds and glandular projections. The frog has light tan dorsum without prominent patterns, except for a few dark brown markings between the eyes. The iris is light greyish-brown. The forelimbs and hindlimbs are light greyish-brown, with faint cross-bands.
 

 

 
19. Nyctibatrachus minimus, Coorg, Karnataka, western ghats, India
 
.
.
 

 

““
 
20. Nyctibatrachus minimus, Coorg, Karnataka, western ghats, India
 
.
 

 

““
 
21. Nyctibatrachus minimus, Coorg, Karnataka, western ghats, India
 
.
.
 

 

““
 
22. Indosylivirana montana, Coorg, Karnataka, western ghats, India
 
या विविध बेडकांमध्ये इन्डोसिल्व्हेनिविराना मोन्टाना हा सह्याद्रीत अंतर्जन्य असलेला बेडुक आहे. तो कर्नाटक राज्यात सह्याद्रीच्या जंगलांमध्ये समुद्रसपाटीपासुन ८०० ते १२०० मीटर उंचीवर आढळतो. त्याचे वास्तव्य चिकमंगलुर, कोडागु व हसन राज्यात आहे. त्याचा आकार ५४ ते ७५ मि मि असतो. हा बेडुक पाणथळ ठिकाणी डबक्यांमध्ये दिसतो.
Indosylvirana montana is a frog species endemic to western ghats India. It is recorded in Karnataka at 800-1200 m above sea level in Chikamangalur, Hassan and Kodagu districts. The size of the frog is about 54-75 mm. These frogs are found in and around water puddles and streams.
 

 

““
 
23. Indosylivirana montana , Coorg, Karnataka, western ghats, India, Coorg, Karnataka, western ghats, India
 
 

 

““
 
24. Indirana frog species Coorg, Karnataka, western ghats, India, Coorg, Karnataka, western ghats, India ,Balloon frog, western ghats, India
 
 

 

““
 
25. Grassland, Shola forest habitat with cofee plantation, Coorg, western ghats, Karnataka, India
 
 
 
 
 


For any queries and suggestions contact at kale_v@rediffmail.com